narendra singh tomar. 
देश

राहुल गांधींना त्यांच्या पक्षातच कोणी गंभीरपणे घेत नाही; कृषीमंत्र्यांची बोचरी टीका

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कॉँग्रेस नेते राहुल गांधी जे काही बोलतात ते त्यांच्या पक्षातही कोणी गंभीरपणे घेत नाही; मग देशाची तर गोष्टच दूरच राहिली, अशा शब्दांत केंद्र सरकारकडून आजच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली. आपल्याला जे शेतकरी भेटले त्या साऱ्यांनी, आमच्याकडे कोणीच सह्या मागण्यास आलेले नाही, असे सांगितल्याचे कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी उपरोधिकपणे सांगितले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राष्ट्रपतींना भेटून त्यांना कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले. तोमर काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, जर राहुल गांधींना शेतकऱ्यांची इतकी काळजी असती तर दहा वर्षे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी थोडे तरी काही केले असते. कॉँग्रेसचा इतिहास कायम शेतकरी विरोधी राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली.

कॉँग्रेसचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांत दोन लाख लोकांनाही भेटले नसतील ; मग कॉँग्रेसच्या पत्रातील सह्या देणाऱ्या शेतकऱ्यांचा २ कोटींचा आकडा कोठून आला, असा उपरोधिक सवाल भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी केला आहे.

ते आश्‍वासन काँग्रेसचे

कॉँग्रेस व राहुल गांधी आता शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांनी केली आहे. ते म्हणाले की, ‘‘ याच कॉँग्रेसने २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात बाजार समित्यांचा एपीएमसी कायदा रद्द करू व हेच तिन्ही कायदेही मंजूर करू असे आश्‍वासन दिले होते. आता याच पक्षाने केवळ राजकीय स्वार्थासाठी कोलांडउडी मारली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT